Friday, 26 September 2014

संघर्ष

संघर्ष

आता हे रोजचच झालय
प्रत्येकाशी संघर्ष, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष
आपल्या हक्कासाठी संघर्ष, आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष
संघर्ष एवढा की आता माझाच माझ्याशी संघर्ष

प्रत्येक नवा संघर्ष मागल्याहून
अधिक वेगळा व अवघड
प्रत्येक नवा संघर्ष माझ्या
अस्तित्वाला Challange करतो

प्रत्येक वेळेस Challenge स्वीकारून मी मैदानात उतरतो
पण प्रत्येक वेळेस मीच विजयी ठरतो असेही नाही

दररोजचा संघर्ष मलाही नकोसा होतो
हे कुठे तरी थांबायला हव अस मला वाटत
हे सर्व थांबवण्यासाठी पुन्हा
एक नवा संघर्ष जन्माला येतो !!!

संघर्ष कधी थांबत नाही
तो कुणासाठी थांबत नाही
संघर्ष हा करावाच लागतो
आपल्यातील मी पण शोधण्यासाठी
संघर्षाची परीभाषा बदलत असते
पण संघर्ष हा कायमचाच असतो

संघर्ष आणी संयमातला डाव चांगलाच रंगतो
पण तो पर्यंत फार उशीर झालेला असतो
डाव अर्ध्यावर सोडून मीच निघून जातो !!!

No comments:

Post a Comment