Friday, 26 September 2014

संघर्ष

संघर्ष

आता हे रोजचच झालय
प्रत्येकाशी संघर्ष, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष
आपल्या हक्कासाठी संघर्ष, आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष
संघर्ष एवढा की आता माझाच माझ्याशी संघर्ष

प्रत्येक नवा संघर्ष मागल्याहून
अधिक वेगळा व अवघड
प्रत्येक नवा संघर्ष माझ्या
अस्तित्वाला Challange करतो

प्रत्येक वेळेस Challenge स्वीकारून मी मैदानात उतरतो
पण प्रत्येक वेळेस मीच विजयी ठरतो असेही नाही

दररोजचा संघर्ष मलाही नकोसा होतो
हे कुठे तरी थांबायला हव अस मला वाटत
हे सर्व थांबवण्यासाठी पुन्हा
एक नवा संघर्ष जन्माला येतो !!!

संघर्ष कधी थांबत नाही
तो कुणासाठी थांबत नाही
संघर्ष हा करावाच लागतो
आपल्यातील मी पण शोधण्यासाठी
संघर्षाची परीभाषा बदलत असते
पण संघर्ष हा कायमचाच असतो

संघर्ष आणी संयमातला डाव चांगलाच रंगतो
पण तो पर्यंत फार उशीर झालेला असतो
डाव अर्ध्यावर सोडून मीच निघून जातो !!!

हे अस किती वर्ष चालायचं ?

हे अस किती वर्ष चालायचं ?

मी आकाशाकडे डोळे मोठे करून बघितलं
पाऊस दिसला नाही दूरवर कोठे
हे अस किती वर्ष चालायचं ?

यावर निराश होवून मी एक सुस्कारा सोडला
त्यावर  एक जण तावा तावा ने बोलला 
हे अस किती वर्ष चालायचे ?

पाऊसच जर असा रुसून बसायचा
आम्ही विश्वास तरी कुणावर ठेवायचा?
हे अस किती वर्ष चालायचं ?

तरुण म्हणतो नोकरीची आशा मंदावली
त्यावर घरातली माणस पस्तावली
हे अस किती वर्ष चालायचं ?

मुलासाठी बापाने VRS घेतली
परिस्थितीला कंटाळून त्याच मुलाने
काल रात्री दोन पेग दारू घेतली
हे अस किती वर्ष चालायचं ?

महागाईमुळे  बायकोने आपल मंगळसूत्र गहन ठेवलं
हिशोबाच गणित सोडवताना जीवनाच सार सूत्रच बिघडल
हे अस किती वर्ष चालायचं ?

                                           
                                    मग मी देवाला प्रश्न विचारला
                                    हे अस किती वर्ष चालायचं ?
                                    पण उपयोग काय ?
                                    प्रश्न निर्माण करणारही तोच
                                    आणी उत्तर देणारही तोच
                                    आपण सारेच त्याच्या पुढे हतबल
                                    हे अस किती वर्ष चालायचं ?